Marathi Bedtime Stories Part 1, मिणविणत्या दिव्यात माझा संवाद संपला होता… मी लिहून सर्वकाही, ख़ुप काही लिहू शकलो नाही, I एक अभुतपुर्व कथा – अग्रांशु सामंतराय
नमस्कार माझ्या प्रिय वाचकांनो! काव्या तारकाच्या (Kavya Taraka) कथांच्या जगात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुमच्या सर्वांसमोर एक अनोखी सस्पेन्सने भरलेली मराठी कथा (Amazing Marathi Suspenseful Story) सादर केली आहे – एक अप्रतिम कथा – अग्रांशू सामंतराय मराठी कथा भाग-१ (An Unprecedented Story – Agranshu Samantaraya Marathi Story Part-I). आशा आहे की तुम्हाला ही आश्चर्यकारक कथा आवडेल.
आपण खरोखर नवीन कथा वाचण्यास उत्सुक आहात? तसे असल्यास, Comment Box मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आज मी मराठीत एक खास कथा घेऊन आले आहे. या खास मराठी कथेमध्ये मी तुम्हाला एक अद्भुत आणि मनोरंजक गोष्ट सांगणार आहे. तर माझ्यासोबत राहा, संपूर्ण कथा वाचा!
A Marathi Suspense Story Part-1
एक मराठी सस्पेन्स कथा भाग-१
मिणविणत्या दिव्यात माझा संवाद संपला होता… मी लिहून सर्वकाही, ख़ुप काही लिहू शकलो नाही, खंत वाटू नये म्हणुन एवढेच सांगेन फक्त की ही कथा पूर्ण व्हावी…
तेवढ्यात कोपर्यात ठेवलेल्या दिव्याची वात विझली… आणि सारे चित्र हळुवार अदृश्य झाले.
तोच पुन्हा बांगड्यांचा खेळता आवाज, मोगऱ्याला सुटलेला दाट सुहास, पुन्हा तेच हसणं, किंचाळनं, मंदिराचा परीसर, परिसरात तुळशी वृंदावन, काहितरी त्या भींती जवळ असल्याचा भास आणि कोणीतरी मागून सूडाचा वार उगारताना आणि श्वास जसा कोंडतोय आणि तेवढ्यातच श्वास गुदमरतोय ह्या वेदनेने घाबरून मनीष उठून जागेवरच बसला, आईला समोर पाहून त्याच्या मनाला शांती मिळाली.
Read This Small Case Study on YOGA
Case Study of Yoga Asanas in Marathi, International Yoga Day
काय रे, काय झालं ? एवढा घाबराघुबरा का झालायस, काय कुठलं भयावह स्वप्न तर नाही ना पाहिलंस ? बाजुच्या डेस्क वर ठेवलेल्या पुस्तकांवर फडक्या ने झाडत असता,आईने अचंबित होऊन मनीषला प्रश्न केला.
Marathi Short Animated Stories for Kids
काही नाही गं, वाटत तुझ्या साफसफाईचे परिणाम माझ्या नाकात घुटमळले म्हणून थोडं गुदमरल्यासारखं झालं,मनीष ने चेहऱ्यावर शंकात्मक भाव आणून म्हणाला.
![]() |
Marathi Suspense Story for children |
पुन्हा तो बिछान्यावर चादर एकवटून झोपायला जाताच, ए …उठ, झोपायच नाही, उठ चल… बघ घड्याळात किती वाजलेत ?
काही लाज… निर्लज्ज माणसा !
त्याने घड्याळाकडे पहिल्यावर “आई काय गं, रविवारी तरी शांती ने झोपु दे गं, आणि थोडा वेळ फक्त, नंतर तसं पण काम आहे बाहेर म्हणून निघायचंय मला आणि जे स्वच्छ भारत अभियान तुला राबवायचय ते तू बाबांच्या खोलीत जाऊन राबव, पण इथे नको प्लीज… !”, मनीष म्हाणाला.
अरे मुर्खा, आईने असं म्हणत कान पकडून उठवत असताना,
Famous Detective Sherlock Holmes Stories in Marathi
आई गं, दुखतोय कान, सो…ड प्लीज, मनीष दुखापतीमुळे ओरडत बिछान्यावरच बसला.
आता ऐक उद्यापासून नवरात्र सुरू होतेय म्हणून ही सारी साफ सफाई चालू आहे, आई उत्तरली.
अगं मग हे शांतीने सांगितलं असतंस ना… का शांतीत क्रांती केलीस, केविलवाण्या स्वरात मनीष म्हणाला.
आरे, तुम्हा लोकांना आज होळी डे आला त्यात माझा काय दोष ? झोपताय निर्लज्जपणे… मदत ही नाही काही कामाला, आई कुचक्या स्वरात म्हणाली.
Marathi Stories Blog
अग हो गं माझे सानुले, पण वीकेंड ला तरी झोपु दे गं, आणि होळी डे नाही हॉलीडे असतो तो… कळलं,
आणि आता जातोय मी, मनीष म्हाणाला.
कुठे ? आईने प्रश्न केला.
माझी फेवरेट जागा… आर्ट गॅलरी, मनीष उत्तरला.
हो का ? काय करतो रे तु त्या आर्ट गॅलरी मध्ये ? आई ने चढत्या स्वरात आळवणी देत विचारलं.
काहीतरी असं करतो ज्याने पैसे ही येतात आणि मन आनंदी ही राहतं, मनीष म्हणाला.
Case Study on Indian Famous Martial Art – Kalraippayattu
हम्म, कळलं… उठलेच आहात तर शंभू करूं घ्यावे, तेवढेच आम्हा पामरांवर उपकार, आई म्हणाली.
का गं असा विचित्र टोमणा मारतेस ? घे उठतोय आणि जातोय आंघोळी ला, मनीष म्हणाला.
( दोन्ही हातांनी टाळ वाजवण्याची नक्कल करत )चला आंघोळ करून पळुयात नाहितर तसे ही मंदिरात जाऊन काकड आरती उदया आहेच, हास्यास्पदरित्या मनीष म्हणाला.
आंघोळ करुन आर्ट गॅलरी मध्ये निघताच…
ओ… मनीशंस्मरामी, नाष्ता…?? आई ने किचन मधुन हाक मारली.
आई गप गं, फक्त मनीष… म..नी..ष… , मला अजून काही बोलू नकोस आणि आता जावं लागेल आधीच उशीर झालाय… मनीष पळत सुटला.
Marathi Pratilipi Suspense Story
मराठी प्रतिलिपी सस्पेन्स कथा
आणि आई मागे विचारत ‘आज होळी डे ना, तुच म्हणालास मला, मग जतोयस कुठे?
बाहेर येऊन त्याने बाईक स्टार्ट केली आणि तो उत्तराला आर्ट गॅलरी चि मीटिंग आहे
आई च्या चेहर्या वर प्रश्न चिन्ह उभा राहताच तोंडतल्या तोंडात पुटपुटली… आर्ट गॅलरीची पण मीटिंग असते का ?
प्रमोद सोबत आल्यावर आर्ट गॅलरी मध्ये जाताच सगळ्या स्टुडंट्स ची गर्दी आणलेल्या नवीन चित्रांकडे वळली होती, मनीष मिटिंगसाठी तसा ही लेट झालेला म्हणुन प्रमोद ने आवाज दिला, मनीष व्हि आर ऑलरेडी लेट, कम लेट्स गो.
पण तरीही मनीष वळुन अंदाज घेऊ लागला की नक्की असं काय आहे तिथे ? तेवढयात प्रमोद ने मनीष चा हात पकडुन त्याला खेचत कॅम्पस कडे आणले.
Read this Marathi Thriller Story, Crime Story
Speckled Band Secrets Success Story Sherlock Holme Marathi 3
काय आहे तुझं तिथे मनीष… चल आपल्याला लेट होतोय, प्रमोद त्याला खेचत नेत असता म्हणाला.
अरे तिथे एवढ्या मुलांची गर्दी का आहे? मनीषने प्रश्न करताच…
अरे, ते तुला नंतर सांगतो आधी चल पाहू एवढी अर्जंट मिटिंग का बोलवलेय ते, प्रमोदने निरुत्तर केले आणि मिटिंगमध्ये घेऊन गेला.
मीटिंग मध्ये पुरातत्व खात्यातली लोकं आली होती . त्यांच्याकडे काही जुनी चित्रकारिता होती, आणि ह्याच चित्रकारिते बद्दल कॅण्डिडंट्सला चित्रकला शाखेत खूप नवीन प्रयोग करता येतिल यासाठी ती मीटिंग बोलावली होती. मनीष ला आर्ट गॅलरी च्या प्रांगणात जायची खूप इच्छा होत होती पण सिनिअर्स च्या समोर बसून मीटिंग अटेंड करणं भाग होते.
क्लासरूम प्रमाणे बेंचेस आणि चेअर्स वर कॉन्फेरंसवाला माहोल घेऊन पुरातत्व खात्याचे माणसं, प्रोफेसर्स आणि त्यांच्या समोर नोटपॅड घेऊन बसलेले त्यांचे स्टूडेंट्स होते.
Sherlock Holmes Crime Story in Marathi by Kavya Taraka
डॉ. बी ए नरसिम्हा राव (पीएचडी इन फिलोसोफी अँड स्कल्पचर ) हे मुलांच्या समवेत उभे राहून त्याच्या सेशन ची सुरुवात केली, तर आज जे कोणी ह्या मीटिंग मध्ये अबसेन्ट न राहता आलेत मी त्यांचे मनापासून स्वागत करतो, आणि ह्या तुमच्या नवीन सेशनची सुरुवात करतो.
तर अनेको कालात्मक गुणांना जिवंत करणाऱ्या माझ्या हुरहुन्नरी कलाकारांनो आजपर्यंत चित्रकलेची आधुनिकता तुम्ही तुमच्या चित्रात साकारली आहे. पण कोणत्याही कलेला तिचा जन्म, तिचा भूतकाळ, तिची स्वतःची एक पार्श्वभूमी असते… तिथेच तिचे खरे अस्तित्व दडलेले असते.
जसा माणूस जन्माला येतो, त्याच कर्तृत्व घडवतो पण त्याचे कर्तृत्व भले कितीही मोठे किंवा लहान असो तो त्याचा जन्म, त्याच अस्तित्व कधीच विसरत नाही हेच खऱ्या अर्थाने एक गुढ आहे कि त्यातून त्याचे पुढचे भवितव्य काय असु शकते ?… इस दॅट क्लिअर माय चिल्ड्रेन्स ?…
(बाकी मुले एका स्वरात) : हो …….
Best Suspense Thriller Marathi Bedtime Stories for Kids
सर्वोत्कृष्ट सस्पेन्स थ्रिलर मराठी कथा
यार, किती पकवतोय हा ? ते जाऊदे… ही मीटिंग झाल्यावर तुझा अजेंडा काय आहे आजचा ? कुठे जायचं आपण ? प्रमोद ने विचारताच,
गप रे, मीटिंग झाल्यावर ठरवू, पुढे बघ, मनीष खेकासतो.
प्रमोद केविलवाणा होऊन फक्त होकारार्थी मान हलवितो.
मनीषच्या तेव्हा ध्यानात येतं की बाहेर जी पैंटीग पाहायची इच्छा झाली होती ती पुरातन खात्याचा एक सॅपल असावा. त्याची ह्यावरून अजूनच हयगय वाढली. त्याच लक्ष दरवाज्यातून दिसणाऱ्या त्या गर्दीकडेच होती.
डॉ. बी ए नरसिम्हा राव अति प्राचीनच्या जागी आत्ता पोस्ट इंडिपेंडंट पिरियड म्हणजेच स्वतंत्रतेच्या नंतर चा काळ चित्रकले मध्ये घडलेल्या प्रगतीबद्दल आणि त्याच्या पाडसादांकडे वळले.
Indian Warrior
१८व्या शतकापासून आपण भले गुलामी पत्करली असावी ते बिटिश कालावधीपर्यंत. पण भारताला कलेचे दान काही आत्ताचेच नाही. जिथंपासून भारतभूमीचे निर्मिती झाली आपण कलेचा जन्म तिथून ते आज पर्यंत वाचत आलोय. त्यातच किमया अशी कि आपल्या शेकडो वर्ष्याच्यापूर्वी ज्या ग्रंथाचा जन्म झाला त्या ग्रंथांपैकी विष्णूपूराणात देखील कलेचा उच्चार केला गेला आहे. कलेमध्ये चित्रकलेला अग्रगण्य मानले गेले आहे त्या ग्रंथामध्ये.
मनीषचे लक्ष काही लागत नव्हते त्याला दरवाज्यातून फक्त त्या चित्रांची आस लागली होती. त्याला फक्त एकदा पाहायचे होते कि नेमका का त्याला भास होतोय ? ही अनोखी अनुभूती कशासाठी ? तेवढ्यात,
हे माय यंग बॉय व्हेअर यु लुक ऐट ? डॉ . रावांनी त्याच्याकडे त्याच्या दुर्लक्षित हावभावांकडे पाहून विचारले.
सर, इफ यु डोन्ट माईंड, कॅन आय आस्क यु समथींग ? मनीष ने प्रश्नार्थी भावाने विचारले.
सर, इफ यु डोन्ट माईंड, कॅन आय आस्क यु समथींग ? मनीष ने प्रश्नार्थी भावाने विचारले.
एस, ऑफकोर्स … माय ब्रेव्ह चाईल्ड, हसतमुखाने डॉ राव म्हणाले.
All Best Marathi Suspense Novels Online
सर्वोत्तम मराठी सस्पेन्स कादंबरी ऑनलाइन
मनीष तेवढ्याच उत्सुकतेने चित्राजवळची गर्दी नाहिशी होताच त्या चित्राला जवळून पाहायची इच्छा पूर्ण करून घेत होता.
(त्याला असं करताना पाहून) अबे ओ, ऐसे मत देख उस पेंटिंग को जैसे कि वो तुम्हारी माशूका है, प्रमोद ने हिंदी अनुवादात हास्यात्मक प्रतिक्रिया दिली.
मनीष त्याच्याच धुंदीत व्यस्त होता…
Success Stories of Sherlock Holmes Adventure in Marathi
Sherlock Holmes New Adventure of Speckled Band in Marathi P4
प्रमोद आणि मनीष एका चित्रा समोर उभे होते.
कुणाचं नेमकं चित्र आहे हे ? प्रमोद उद्गारला.
मनीष ने चित्राखाली लिहिलेल्या चित्रकाराचं नाव वाचलं, रणबीर सिंग १९८३ आणि चित्राच नाव आहे… तेवढ्यात प्रमोदला हसू आवरले नाही, काय ? रणबीर सिंग ? हा तेव्हा पण होता काय ? मग तर त्याचा आत्ताच ट्रेंड बघता तर हे चित्र त्याचचं आहे. काही शंका नाही.
तो जोरजोरात ह्यावरून हसू लागला. तेवढ्यात मनीष च्या कानावर एक शब्द पडला डॉ.राव उच्चारले, हे पहा चित्र,१९००च्या सदीचा अज्ञात चेहरा…. अग्रांशु सामंतराय … !
मनीष तिथेच थांबला, थोड्यावेळासाठी त्याला असं वाटू लागलं की त्याने एवढ्या वर्ष ज्या अनभिज्ञ ओळखीच्या तो शोधात होता तीच नेमकी त्याच्या कानी पडली होती. त्याने डॉ रावांकडे पहिले आणि तो त्या चित्राकडे सरसावला …..
Next part :
Best Thriller Suspenseful Marathi Story
Next Part:
Best Thriller Suspenseful Marathi Story अग्रांशु सामंतराय P2
Marathi Story Chitra, Children Bedtime Stories in Marathi
FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)
मराठी सस्पेन्स कथा काय आहे? What is Marathi Suspense Story?
मी pdf मध्ये मराठी सस्पेन्स स्टोरीज कसे डाउनलोड करू शकतो? How can I download Marathi suspense stories in pdf?
मला लहान मराठी सस्पेन्सफुल कथा कुठे मिळतील? Where can I find short Marathi suspense stories?
ऑनलाइन सर्वोत्तम मराठी सस्पेन्स कथा कोणती आहे? What is the best Marathi suspense story online?