एक अभुतपुर्व कथा – अग्रांशु सामंतराय MARATHI STORY PART – 2

त्या चित्राच्या समोर येऊन उभा राहिला. “काय म्हणालात सर ?”, मनीषने स्वतःचा भ्रम तोडत विचारले.

डॉ रावांचे मनीषकडे लक्ष वळले, “काय ?” डॉ रावांनी विस्मयकारक होऊन विचारताच… तुम्ही कुणाचतरी नाव घेतलात आत्ता, कोण म्हणालात तुम्ही ? पुन्हा एकदा मनिषने प्रश्न केला.”अग्रांशु सामंतराय ” डॉ रावांनी पुन्हा एकदा तेच नाव उद्गारलं.

मनीष थबकला त्याने आश्चर्याने चित्राकडे पाहिलं, त्याने चित्राकडे पाहताच त्याच्या डोळ्यांच्या सूक्ष्मबिंदूंची तरलता आपोआप विस्तारली, भुवयांमधील अंतर वाढत गेले, चकित भावाने भुवयाही उंचावल्या, त्याच्या सभोवतालचा आवाज मंदावला… त्याचा डोळ्यांची पापणीही लवली नव्हती तेवढ्यात त्याच्या तोंडातुन उद्गार आले “पद्मा”.

प्रमोद त्याच्या जवळ आला चित्राकडे पाहिले पुन्हा त्याच्याकडे पाहिले आणि,”बडी, ही पद्मा कोण आहे ?” भावशुन्य चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असल्यासारखे विचारले.आजपर्यंत जे नाव प्रमोदने ना ऐकलं आणि ज्या पद्माबद्दल मनीषला माहितही नाही, तर आज हे अनोळखी नाव त्याच्या तोंडातून आलं कसं ? आसपासची गर्दी चित्र पाहत भिंतीच्या टोकापर्यंत गेली, भिंतीच्या अलीकडे असलेल्या मनीषचे हातपाय जसे आखडले होते, मनीष तिथेच उभा होता. प्रमोदने त्याचा भ्रमिष्ठपणा दूर करताना त्याला हातासकट हालवून पहिले, त्याला बाजूनेच जाग्यावर आणण्याचा प्रयत्न करताना,” मनिष… मनिष… ये मनिष… जागेवर ये… ” ,मनिष जागा झाला. जसा काय जागेपणी स्वप्नांच्या दुनियेत हरवला होता.

मनीष जागेवर येताच, ” हिला मी कुठेतरी पाहिलंय, पण कुठे ?” अचानक मनिष म्हणाला. “अरे काय बोलतोयस तू ? कळतंय का तुला ? अरे त्या चित्राकडे बघ… तिचा साधा चेहराही दिसत नाही…” प्रमोद प्रश्नार्थी होऊन गडबडलेल्या स्वरात बोलला.

मनिष थोडावेळ थांबला… “मी… (मनिष शांत झाला) चल आत्ता माझ्यासोबत… चल.. चल.. पटकन चल…” मनिषने गडबडीत प्रमोदला तिथून सोबत निघण्याचा इशारा केला आणि तो स्वतः तिथून धावत इन्स्टिटून्टच्या चौथ्या मजल्यावर आर्ट गॅलरी च्या आर्ट एक्सिबिशनसाठी नेमलेल्या नॉमिनेटेड पैंटिंग्स जिथे ठेवल्या होत्या त्या रूम मध्ये तो धावत गेला. प्रमोदही त्याच्या मागे धावत सुटला.डॉ राव मुलांच्या गर्दीत चित्र पाहण्यात रमले होते. त्यांनी अचानक त्यांच्या हातावरच्या घड्याळाकडे पाहिले, त्यांना त्यांच्या पुढच्या कॉन्फेरंस लेक्चर्ससाठी उशीर झाला होता, हे लक्षात येताच त्यांनी मुलांना क्लास डिसमिस झाल्याची सूचना दिली.

मनिष रूम मध्ये जाताच उजव्या हाताच्या शेवटच्या कोपऱ्यात एका फॅब्रिकच्या कपड्यात झाकलेली पेटिंग खोलून मनीषने प्रमोदसमोर उभी केली.प्रमोदचे डोळे आश्चर्याने विस्तारले तो तिथेच स्तब्ध झाला. रूममध्ये त्या दोघांव्यतिरिक्त कोणीच नसावे, फक्त चित्रांची गर्दी त्याशिवाय कोणीच नाही आणि सारा माहोल शांत, दोघेहि निःशब्द उभे होते. चित्र स्वतःकडे वळवले, चित्राकडे कटाक्षाने नजर टाकली. प्रमोदला विश्वास होईना… प्रमोदने भिंतीवर लावलेल्या चित्रामध्ये चित्राच्या उजव्या कोपऱ्यात त्या चित्राचे वर्ष पहिले होते, ते चित्रही आजच सकाळी पहाटे चारच्या दरम्यान मुजियममधून आले होते. त्या चित्राला ना मनीषने पाहिलं होत, ना प्रमोदने… मग हे चित्र मनीषने कसं रेखाटलं ? हा प्रश्न दोघांनाही होता.” तू हे चित्र आधी कधी पाहिलं होतसं ? तू नक्की हे इंटरनेट वर पाहून काढलं असशील. आठवून बघ…” प्रमोदने मनीषला स्तब्ध होऊन प्रश्नार्थी विचारले.पुन्हा एकदा रूम मध्ये विचित्र शांतता… मनीष त्या चित्राकडे पाहत म्हणाला, “नाही… जेव्हा प्रोफेसर रावांनी ते नाव उद्गारलं तेव्हा मला असं का वाटलं कि ते नाव माझ्या ओळखीचं आहे ? ही पद्मा कोण ?” मनीषने स्वतःला प्रश्न करताच,काय ? जीवाचा अचंबित झालेला प्रमोद जोरात ओरडला, आणि तो आवाज सामसूम असलेल्या रूममध्ये घुमला. “तुला पद्मा कोण माहित नाही तर तू तिथे पद्मा का बोल्लास ? आणि मी तिथे विचारत होतो तर तू उत्तर न देता इथे मरणाच्या हाफा टाकत का आलास ? आणि हे चित्र तू काढलस कधी ? हे तुझं आहे… पण हे खरंच तुझंच आहे ना ?” प्रमोदचे प्रश्न थांबवत मनीष बोलला, “हा अग्रांषु सामंतराय कोण आहे ?”.”मला वाटतं की, मला ह्या मागे काय कारण आहे, हे मला कळलं पाहिजे.” मनीष विस्मयचकित होऊन म्हणाला‌.”अरे मनीष, मे बी तुझी तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे असं काही तरी होत असावं तुझ्यासोबत.” प्रमोद काळजीत म्हणाला. “तु चल घरी आधी, चल बघू.””थांब प्रमोद, मी जोपर्यंत शोधत नाही की, कोण आहे हा ?” मनीष स्तब्ध होता.”मनीष, कॉइंसडंस असेल हा… तु हे चित्र पाहीलेलं असशील कुठेतरी, म्हणून तु असंच रॅन्डमली काढलं असावं.” प्रमोदने हे बोलताच..‌ “मला स्वप्नात पण हेच दिसतं, प्रमोद… नाही माहित की का ?” प्रश्नार्थक नजरेने मनीष बोलला.

“काय ?”, चकित होऊन प्रमोद म्हणाला. “तु काय म्हणतोयस, अ…अ…अग्रांशु कोण, कोण ती प…पद्मा ? का…काय हे चित्र ? क… कुठुन आली ती ? काय चाललंय हे तुझं ? प्रमोद पुर्णपणे भांबावलेल्या सारखा झाला होता. मनीषला काहीच कळण्यास गत्यंतर नव्हतं. सर्व त्याच्या साधारण बुद्धिमत्तेच्या विपरीत घडत जात होतं.

ह्या पुढे मनीषच्या आयुष्यात नेमकं काय होणार आहे, कोण आहे अग्रांशु ? काय आहेत ती स्वप्ने ? पद्मा कोण ? ह्या साऱ्या गोंधळात काय होणार आहे…. ? कुठे शोधेल मनीष ह्या भुतकाळातील लोकांना ? अनेको प्रश्नांनी घेरलेला मनीष, काही क्षणातच घडलेले हाताबाहेरच्या घटना… ह्या मानसिक खेळांना तो कसा हाताळेल ?असेच माझ्यासोबत जोडुन रहा… आणि न विसरता तुमच्या लाडक्या ब्लॉगला म्हणजेच काव्य तारका ब्लॉगला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका…आणि तुम्हा सर्वांना रोज मी अशा छान चकीत करून टाकणाऱ्या अनेको गोष्टी घेऊन येत राहीन…पुन्हा भेटू…धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *